Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Contact Person Contact Us
Medical Activities
पुरग्रस्तांची हाक

Kolhapur  August 21,2019

  

पश्चिम महाराष्ट्र मध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापूराने अक्षरशः थैमान घातले,अपरिमित हानी, लोकांचे तसेच पशु चे बळी गेले हे सर्व मन हेलवणारे होते म्हणून *आपल्या पूरग्रस्त बांधवाकरिता नानल आयुर्वेद रिसर्च फाउंडेशन पुणे आणि जगन्नाथ बाबा युथ फाउंडेशन विटा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील नागठाणे येथे शिवप्रेमी मित्र मंडळ, जामवाडी येथे श्री किरण साळुंखे व डॉ सचिन नलावडे मित्र परिवार, कारंदवाडी कृष्णा नगर हाळ येथे डॉ कणसे यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर, औषधे वाटप करण्यात आले, जवळ पास 1600 ते 1800 पुरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यात आली..*
या करिता खालील डॉक्टर आणि त्यांची टीम सहभागी झाली.
*डॉ ऐषा नानल, डॉ ऋतुराज कदमपाटील, डॉ परवेझ बागवान, डॉ पायल व्हावळ, डॉ शरद गीते, डॉ आशिष गायकवाड, डॉ सत्यवान रणनवरे, श्री जगन्नाथ बाबा पाटील, श्री आशिष पाटील, संकेत खरपुडे, प्रणय गुप्ता आदी चे सहकार्य लाभले*